मावळच्‍या (पुणे) शिळिंब गावातील भात शेतीतून श्री गणेशाची प्रदक्षिणा !

शेतीच्‍या उत्‍पन्‍नांमध्‍ये वाढ होत असल्‍याची शेतकर्‍यांची श्रद्धा !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – मावळच्‍या शिळिंब गावातील ग्रामस्‍थांनी कोकणच्‍या धर्तीवर भात शेतीतून प्रदक्षिणा घालत गणपति बाप्‍पाचे जंगी स्‍वागत केले. या वेळी संपूर्ण गावात गावकर्‍यांनी घरगुती गणपतीची आराधना करतांना भात शेतीच्‍या बांधावरून गणपति बाप्‍पाला आणून घरात विराजमान केले. श्री गणेशाचे आगमन भात शेतीतून केल्‍यानंतर पिकांच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये मोठी वाढ होत असल्‍याची श्रद्धा शेतकर्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

१०० वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही शिळिंब गावाने जपली असल्‍याचे पहावयास मिळत आहे.

कृषी प्रधान तालुक्‍यात या गणेशोत्‍सवामध्‍ये ‘कृषी अधिकारी’ यांना विशेष मान दिला जातो; कारण मावळ कृषी विभागाच्‍या वतीने मावळ येथील शेतकर्‍यांची काळजी घेण्‍यात येते. त्‍यामुळे ‘इंद्रायणी’ भाताच्‍या शेतीतील गणपतीची कीर्ती संपूर्ण जिल्‍ह्यात पसरली आहे.