राज्यात सर्वत्र पावसाचा जोर !
मुंबई – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊसही पडत आहे. या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामांनाही परत वेग आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘येल्लो अलर्ट’ देण्यात आला आहे.