‘लव्ह जिहाद’ हा हिंदु धर्मावरील भीषण आघात ! – सौ. सीमा मानधनिया, हिंदु जनजागृती समिती
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २२ सप्टेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु धर्मावरील भीषण आघात असून ‘लव्ह जिहाद’ची भयावहता लक्षात घेऊन प्रत्येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासमवेत धर्मशिक्षित व्हायला हवी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सीमा मानधनिया यांनी केले. इचलकरंजीतील ‘महेश हाऊसिंग सोसायटी’मधील ‘महेश कॉलनी गणेशोत्सव मंडळा’मध्ये ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. याचा लाभ २५० जिज्ञासूंनी घेतला.
विशेष
‘महेश कॉलनी’मधील श्री. संतोष काबरा यांनी ‘लव्ह जिहाद’चे अनेक ग्रंथ प्रायोजित केले. (‘लव्ह जिहाद’ची भीषणता लक्षात घेता इतरांचे प्रबोधन करण्यासाठी ग्रंथ प्रायोजित करणार्या श्री. संतोष काबरा यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा ! – संपादक)