महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील महिलांनाही आता विनामूल्य बसप्रवास !
बेळगाव – कर्नाटक राज्य सरकारने महिला वर्गासाठी ‘शक्ती योजने’च्या अंतर्गत राज्यभरात विनामूल्य बस प्रवास चालू केला आहे. या योजनेच्या अंतर्गत सीमावर्ती भागात रहाणार्या महिलांना विशेष करून महाराष्ट्रात जाणार्या कर्नाटक बसला ही सोय उपलब्ध नव्हती. ही त्रुटी दूर करत ‘वायव्य परिवहन मंडळा’ने कोल्हापूर, इचलकरंजी, मिरजपर्यंत म्हणजेच कर्नाटकाच्या हद्दीपासून २० किलोमीटर अंतरापर्यंत या योजनेचा विस्तार केला आहे.