गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य औषधोपचार मिळणार !
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्नीशमनदल, विद्युत् विभाग आणि महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग या सर्वांनी कामकाजाचे नियोजन केले आहे. उत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्याचसमवेत आरोग्य विभागाकडून ४ फिरत्या चिकित्सालयांची सुविधा विसर्जन मार्गावर दिली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्व दवाखाने आणि रुग्णालये यांमध्ये रुग्णांना विनामूल्य औषधोपचार मिळणार आहेत. विसर्जन घाटांवर १३० जीवरक्षकांची नियुक्ती केली असून नदी आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी नियंत्रक कठडे उभारले आहेत.