आळस घालवण्‍याचा सोपा उपाय

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४०

‘बर्‍याच वेळा काही जणांना सकाळी उठल्‍यावर किंवा काही खाल्‍ल्‍यावर आळस येतो. ‘काही करू नये. झोपून रहावे’, असे वाटत असते. अशा वेळी नुसते बसून किंवा झोपून न रहाता लगेच उठून काहीतरी शारीरिक श्रमाची कामे करावीत. घरातील केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे, तसेच बागकाम करणे यांसारखी कामे करावीत. हे जमले नाही, तर आपल्‍या क्षमतेनुसार १० ते २० मिनिटे चालावे किंवा धावावे; परंतु आळस आला असतांना बसून राहू नये. (खाल्‍ल्‍यावर लगेच ‘चालणे किंवा धावणे’, हे व्‍यायाम करू नयेत. नेहमीची श्रमाची कामे केली, तर चालते.)

वैद्य मेघराज पराडकर

या कृतींनी शरिरातील रक्‍ताभिसरण चांगले होते आणि आळस निघून जातो. थंडीत गाडीचे इंजिन पुरेशा प्रमाणात गरम झाल्‍यावर गाडी सुरळीत चालू लागते, तसे आपले शरीर ‘तापले’ की, आळस निघून जातो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan