इलेक्ट्रिक एस्.टी. गाड्या खरेदीसाठी राज्यशासन २५ कोटी रुपये देणार !
मुंबई – ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१’ च्या अंतर्गत बसगाड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. प्रदूषण आणि इंधनावरील व्यय रोखण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे.