कॅनडामध्ये आता निवडणुका झाल्या, तर जस्टिन ट्रुडो यांचा होणार पराभव !

पियरे पोयलिवरे व जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये वर्ष २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर  ‘इप्सोस’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भावी पंतप्रधान म्हणून विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना केवळ ३१ टक्के, तर विद्यमान विरोधी पक्षनेते पियरे पोयलिवरे यांना ४० टक्के लोकांनी पसंती दिली आहे. यावरून ट्रुडो यांचा पुढील निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता आहे.

१.  ‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.

२.  सर्वेक्षणानुसार देशातील ६० टक्के लोकांना वाटते की, ट्रुडो यांनी त्यांच्या लिबरल पक्षाचे नेतृत्व अन्य कुणाकडे सोपवले पाहिजे.

३. कॅनडातील ५३ टक्के लोकांना वाटते की, एन्.डी.पी. पक्षाने ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा आणि निवडणूक घ्यावी.

४. एन्.डी.पी. पक्षाचे १८ शीख खासदार आहेत. याचे प्रमुख जगमीत सिंह असून ते खलिस्तानवादी आहेत. त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यामुळेच ट्रुडो सरकार सत्तेवर आहे. यामुळेच ट्रुडो खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालत आहेत.