कर्नाटकमधील सरकारी शाळेत विद्यार्थिनीने श्री गणेशाची पूजा केल्याने शिक्षिकेकडून मारहाण !
मारहाणीमुळे विद्यार्थिनीला अस्थिभंग झाल्याने शिक्षिका निलंबित
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील के.जी.एफ्. तालुक्यातील अल्लीकली गावातील प्राथमिक शाळेत ७ वीच्या विद्यार्थिनीने वर्गात श्री गणेशाची पूजा केल्याने महिला शिक्षिकेने तिला मारहाण केली. यात या विद्यार्थिनीच्या हाताचा अस्थिभंग झाला. यामुळे तिच्या पालकांनी शाळेत येऊन जाब विचारला. यानंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले. यासह या विद्यार्थिनीवरील उपचारांचा खर्चही देण्याचा आदेश या शिक्षिकेला देण्यात आला आहे. शिक्षिकेचे नाव हेमलता आहे.
कर्नाटक के सरकारी स्कूल में भगवान गणेश की पूजा करने पर टीचर ने बरपाया कहर, मारकर 7वीं की छात्रा का हाथ तोड़ा#Karnataka #School https://t.co/lUVtezpYQB
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 21, 2023
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? |