पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्यू !
मुंबई – पालघर जिल्ह्यात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना ३ जणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. वाडा तालुक्यातील कोणसई गावात ओहळावर आस्थापनातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना जगन मौर्य (वय ३८ वर्षे) आणि सुरज प्रजापति (वय २५ वर्षे) या परप्रांतियांचा बुडून मृत्यू झाला. अन्य एका दुर्घटनेमध्ये पालघर जिल्ह्यातीलच गोर्हे येथील तलावात प्रकाश ठाकरे या युवकाचा श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला.