पनवेलमधील लेडीज बारवर धाड
नवी मुंबई – पनवेल तालुका पोलिसांनी स्वतःच्या हद्दीतील २ लेडीज बारवर नुकतीच धाड टाकून ३४ महिला, तसेच २३ अन्य लोक, तसेच व्यवस्थापक, नोकर आणि ग्राहक अशा ५७ व्यक्तींना कह्यात घेतले. अनेक बारमध्ये महिला वेटरकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, तसेच बार ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ उघडे होते. ‘महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध’, तसेच ‘महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम’ यांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.