पिंपरी-चिंचवड विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्‍णवाहिका सज्‍ज !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी चिंचवड – शहरातील प्रमुख श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेच्‍या वतीने वैद्यकीय पथकांसह सुसज्‍ज रुग्‍णवाहिका सज्‍ज ठेवल्‍या आहेत. इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्‍नीशमनदल, आपत्ती व्‍यवस्‍थापन आणि सुरक्षा पथक यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, तसेच पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विसर्जनाला प्राधान्‍य द्यावे, असे आवाहन आयुक्‍तांनी केले. (शास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे. – संपादक)