केनोपनिषद
‘वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदे ! अंतिमचा अर्थ शेवटचा, असा नव्हे. अंतिम म्हणजे Ultimate किंवा सर्वोत्तम. वेदांमध्ये स्थूलपणे (अंदाजे) ९६ टक्के भाग कर्मकांडाचा आहे. अमुक केले, तर अमुकची प्राप्ती होईल किंवा अमुकसाठी अमुक यज्ञ करावा इत्यादी. केवळ ढोबळमानाने ४ टक्के तत्त्वज्ञानाचा भाग आहे आणि तो भाग म्हणजे उपनिषदे. छोटी मोठी धरून एकंदरित २२० उपनिषदे उपलब्ध आहेत. ती तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असल्यामुळे त्यांचा अभ्यास व्हावा.’
(संदर्भ : साप्ताहिक शिवपथ, फेब्रुवारी २०१९)