कडेगाव (सांगली) येथील प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांचे निधन !
कराड, २१ सप्टेंबर (वार्ता.) – कडेगाव-पलूस, जिल्हा सांगली येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय ४४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन संस्थेच्या मलकापूर येथील साधिका सौ. कांतावती देशमुख यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुले, लहान भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सनातन परिवार देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. डॉ. विजय देशमुख यांनी तालुक्यातील येरळा नदीतील अवैध वाळू तस्करी, उत्खनन रोखण्यासह महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष योगदान दिले होते. त्यांनी ‘झिरो पेंडन्सी’ची (शेष काम न ठेवणे) प्रभावीपणे कार्यवाही केली होती.