भारतीय पत्रकाराच्या प्रश्नावर जस्टिन ट्रुडो यांचे उत्तर देण्याऐवजी पलायन !
खलिस्तानी आतंकवाद्याच्या हत्येचे प्रकरण !
न्यूयॉर्क (अमेरिका) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो येथे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. या वेळी भारतीय वृत्तसंस्था ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या पत्रकाराने ट्रुडो यांना भारतावर त्यांनी केलेले आरोप भारताने फेटाळल्याविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नावर ट्रुडो उत्तर न देता पुढे निघून गेले. पत्रकार ट्रुडो यांच्या मागे जाऊन त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारल्यावर ते अधिक जलद गतीने पुढे निघून गेले.
Shoot and scoot! At UN, Trudeau Avoids Indian Media Questions On Khalistan Terrorist Twice https://t.co/NxX0ySDZKS
— Neha Khanna (@nehakhanna_07) September 21, 2023
संपादकीय भूमिकाट्रुडो यांच्याकडे भारतावर केलेल्या खोट्या आरोपांवर उत्तर देण्यासारखे काही नसल्याने ते आता त्यापासून पळ काढू लागले आहेत, हे जग पहात आहे ! |