(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो
जस्टिन ट्रुडो यांचा रशियाला उपदेश
न्यूयॉर्क (अमेरिका) – भारतावर निराधार आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता रशियाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये बोलतांना ट्रुडो म्हणाले की, रशियाने ऊर्जा आणि खाद्य यांना शस्त्र बनवले आहे. त्याच्या न्यूनतेमुळे कोट्यवधी लोकांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Canadian PM Justin Trudeau accuses Russia of weaponising energy and food
Read @ANI story | https://t.co/i4O6hPUFdV#Canada #JustinTrudeau #Russia #RussiaUkraineWar #UNSC #Ukraine pic.twitter.com/K1Kb9hr3RH
— ANI Digital (@ani_digital) September 21, 2023
ट्रुडो पुढे म्हणाले की, आम्हाला नाही वाटत की, युक्रेनला समर्थन देणे अथवा सातत्यपूर्ण वैश्विक विकास या सूत्रांपैकी कुणा एकाला निवडले पाहिजे. दोन्हीसाठी एकाच वेळी प्रयत्न व्हायला हवेत. रशियाने युक्रेनमधून सैन्य मागे घ्यायला हवे. दोन्ही देशांनी शांतता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ही शांती मानवतावाद आदी मूल्यांवर आधारित असली पाहिजे.
संपादकीय भूमिकास्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ? |