शाळांमधून चालू असलेला इस्लामी प्रचार रोखा ! – जयेश थळी, सचिव, गोमंतक मंदिर महासंघ
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘सेक्युलर (निधर्मी) विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?’
फोंडा (गोवा) – गोव्यात गेल्या १० वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ‘इस्लामिक कार्यशाळे’चे आयोजन केले जात असल्याचे ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संस्थे’ने स्वत: सांगितले आहे. या संघटनेचा तुर्कीये देशातील ‘टुगवा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध आहे. विद्यार्थ्यांमध्ये कट्टर इस्लामचा प्रचार करून ‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाप्रमाणे ‘द गोवा स्टोरी’ सिद्ध केली जात आहे. गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.
गोव्यातील तथाकथित निधर्मीवादी केशव स्मृती विद्यालयाच्या (दाबोळी, वास्को) घटनेवर मूग गिळून गप्प आहेत आणि एखाद्या घटनेत अल्पसंख्यांक पीडित असते, तर त्यांनी देशभर आरडाओरड केली असती. ‘सेक्युलर’ विद्यालयांमधून हिंदूंना स्वत:च्या धर्माचे शिक्षण मिळत नाही; मात्र शाळांमधून ‘स्कूल जिहाद’ चालवला जात असून तो रोखला पाहिजे, असे उद़्गार ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्री. जयेश थळी यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ आयेजित केलेल्या ‘सेक्युलर विद्यालयांमध्ये इस्लामचा प्रचार ?’, या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार ! – संजू कोरगावकर, दक्षिण गोवा सहमंत्री, विश्व हिंदु परिषद
केशव स्मृती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शिक्षण खाते, विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ, विद्यार्थ्यांचे पालक यांना अंधारात ठेवून विद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना जवळच्या मशिदीत इस्लामिक कार्यशाळेसाठी पाठवले. विद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कृती ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ यांच्या सूचनेवरून केली. मशिदीत उपस्थित मौलवीने (इस्लामचे धार्मिक नेते) ‘अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे आणि हिंदूंचे देव नसून ते दगड आहेत’, असे सांगून विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद केला. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने स्वत:ला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा गैरवापर केला. विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्यास भाग पाडले.
पहा आणि इतरांनाही पहायला द्या –
सेक्युलर स्कूलों में इस्लामी प्रचार ? | #Secularism #HinduRashtra https://t.co/24aGiB7cGx
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) September 16, 2023
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. वर्ष २०१८ ते २०२३ या कालावधीत गोव्यातून १ सहस्र ७५३ मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी आहे. सरकार आणि प्रशासन यांनी केशव स्मृती विद्यालयाचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमला पाहिजे. निलंबित प्राचार्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे.
हे ही वाचा –
♦ ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ या संघटनेला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घाला ! – विश्व हिंदु परिषद, गोवा
https://sanatanprabhat.org/marathi/720275.html
|