देवरिया (उत्तरप्रदेश) येथे दारू तस्‍करांकडून हवालदाराची वाहनाखाली चिरडून हत्‍या !

प्रतीकात्मक छायाचित्र

देवरिया (उत्तरप्रदेश) – येथे दारू तस्‍कारांनी एका हवालदाराला वाहनाखाली चिरडून हत्‍या केली. दारूची तस्‍करी होत असल्‍याच्‍या मिळालेल्‍या माहितीवरून दारू तस्‍करांना पकडण्‍यासाठी रस्‍त्‍यात अडथळे उभारणार्‍या एका हवालदाराची दारू तस्‍करांनी त्‍यांच्‍या ‘स्‍कॉर्पिओ’ वाहनाखाली चिरडून हत्‍या केली. महानंद यादव असे या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्‍यांना गंभीर स्‍थितीत गोरखपूरमधील रुग्‍णालयात भरती केले; मात्र  तेथे त्‍यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.