राज्यभरात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !
मुंबई – राज्यभरात १९ सप्टेंबरला श्री गणेशमूर्तींचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. यातील दीड दिवसांच्या आणि प्रामुख्याने घरगुती श्री गणेशमूर्तींचे २० सप्टेंबरला ‘गणपति बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपति गेले गावाला चैन पडेना आम्हाला’, या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र सोडून बहुतांश ठिकाणी पावसाचे संकट असल्याने भाविकांनी श्री गणेशाकडे पाऊस येण्यासाठी प्रार्थना केली.