नियमित व्यायाम आणि ठराविक दिवसांनी उपवास करण्याचे महत्त्व
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३८
‘गाडीवर मळाचा थर बसून ती गंजून खराब होऊ नये, यासाठी आपण ती वेळोवेळी धुतो. घर स्वच्छ रहावे, यासाठी आपण वेळोवेळी केर, जळमटे काढतो आणि लादी पुसतो. त्याप्रमाणे आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी प्रतिदिन व्यायाम आणि साधारण १५ दिवसांतून एकदा रात्री काही न खाता उपवास करावा. ‘प्रतिदिन सकाळी अल्पाहारापूर्वी व्यायाम करणे’, हे प्रतिदिन घरातील केर काढण्याप्रमाणे आहे. एका वेळेला काही न खाता उपवास केल्याने शरिरातील विजातीय द्रव्ये बाहेर पडून जाण्यास साहाय्य होते आणि शरीर निरोगी रहाते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan