राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती !
पुणे – राज्यातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्ह्यांमध्ये १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीमध्ये पडणार्या सरासरी पावसात २० टक्क्यांहून अधिक न्यूनता दिसून आली. नगर, सांगली, सातारा, जालना आणि बीड जिल्ह्यांत पडणार्या पावसात ४० टक्क्यांहून अधिक न्यूनता झाल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १ जून ते १८ सप्टेंबरपर्यंत सरासरी ९२७.९ मि.मी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात ८४५.४ मि.मी. पाऊस झाला आहे.
मराठवाडा येथे २२, मध्य महाराष्ट्र १९, विदर्भ ७, रत्नागिरी ५ आणि मुंबईमध्ये ८ टक्के पाऊस अल्प झाला आहे. कोकणामध्ये ६, पालघर १९, रायगड ९, ठाणे २५, मुंबई उपनगरांमध्ये २८, नांदेड १९, बुलडाणा १, गडचिरोली ३ आणि यवतमाळमध्ये ७ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.