६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) हिला गौरी-गणपतीच्‍या काळामध्‍ये आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

१. गौरी गणपतीचे अस्‍तित्‍व जाणवणे

कु. श्रिया राजंदेकर

अ. ३१.८.२०२२ या दिवशी, म्‍हणजेच गणेश चतुर्थीच्‍या दिवशी आमच्‍या घरी गणपतीची पूजा आणि आरती चालू होती. तेव्‍हा ‘तेथे साक्षात् गणपति उपस्‍थित आहे अन् तोच सर्व करून घेत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. गौरी आगमनाच्‍या दिवशी माझी आई गौरींचे मुखवटे घेऊन घरात येत होती. तेव्‍हा ‘ते मुखवटे नसून साक्षात् गौरी आल्‍या आहेत’, असे मला जाणवलेे.

इ. गौरी-गणपतीच्‍या काळामध्‍ये ‘संपूर्ण घरामध्‍ये गौरी आणि गणपति यांचे तत्त्व जाणवत होते आणि त्‍यांचे अस्‍तित्‍व जाणवत होते. त्‍या कालावधीत माझ्‍या मनाची स्‍थिती स्‍थिर आणि शांत होती, तसेच माझे मन निर्विचार झाले होते.

२. ‘संपूर्ण घरामध्‍ये गणपतीचे तत्त्व प्रक्षेपित होत आहे आणि घरातील आवरण नष्‍ट होत आहे’, असे मला जाणवले.

३. ‘गौरी घरात आणतांना त्‍यांच्‍या मागून पांढर्‍या रंगाचा प्रकाश येत आहे’, असे मला दिसले.

४. मी गौरींच्‍या चरणांवर डोके ठेवले त्‍या वेळी ‘ते चरण मातीचे नसून प्रत्‍यक्ष गौरींचे चरण आहेत आणि मी त्‍यांच्‍या चरणांवर डोके टेकवले आहे’, असे मला जाणवले.

५. साधक आणि संत यांना पाहून ‘गौरींचे डोळे पाणावले आहेत’, असे दिसणे : जेव्‍हा साधक आणि संत गौरींचे दर्शन घेण्‍यासाठी घरी आले, तेव्‍हा ‘गौरींचे डोळे पाणावले आहेत’, असे मला दिसत होते. त्‍या दोघींच्‍या डोळ्‍यांत भावाश्रू दिसत होते. ‘साधक आणि संत यांना पाहून गौरींचाही भाव जागृत झाला आहे’, असे मला जाणवले.

‘हे गुरुदेव, आपण मला गौरी-गणपती यांच्‍याविषयी अनुभूती दिली. माझ्‍याकडून ही अनुभूती लिहून घेतली. मला गौरी आणि गणपति यांचे तत्त्व अनुभवायला दिले. यासाठी मी आपल्‍या  श्रीचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. श्रिया राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक