आद्यशंकराचार्य यांच्या भव्य पुतळ्यासह ‘शंकर संग्रहालया’ची उभारणी !
ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे आज ‘एकात्म धाम’चे उद़्घाटन
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकारकडून सनातन धर्माचे पुनरुद्धारक, सांस्कृतिक एकात्मतेचे दूत आणि अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचा सिद्धांत मांडणारे आद्यशंकराचार्य यांचे व्यक्तीमत्त्व, विचार आणि अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान यांची त्यांची दीक्षाभूमी – कर्मभूमीला ओंकारेश्वरमध्ये ठोस आकार दिला जात आहे. ओंकारेश्वर येथे ‘एकात्म धाम’ उभारण्यात येत आहे. ‘एकात्म धाम’मध्ये शंकराचार्यांच्या पुतळ्यासह भारताचा सांस्कृतिक वारसा दर्शवणार्या अलौकिक ‘शंकर संग्रहालया’ला भेट देता येणार आहे. ओंकारेश्वर येथे २१ सप्टेंबरपासून होणार्या ‘शंकरावतारनाम’ कार्यक्रमात शैव परंपरेवर आधारित संगीत आणि नृत्य सादरीकरण यांतून भारताची सांस्कृतिक एकात्मता चित्रित करण्यात येणार आहे. या संग्रहालयात आद्यशंकराचार्यांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर आधारित ‘शंकर’ हा लघुपट दाखवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात देशभरातील अनेक संत आणि विद्वान यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनाही मध्यप्रदेश सरकारने निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. |