महिला आरक्षण विधेयकावर संसदेत दिवसभर चर्चा : काँग्रेससह अनेक पक्षांचा पाठिंबा
या आरक्षणात मागासवर्गियांना आरक्षण देण्याचीही मागणी
नवी देहली – लोकसभेत मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर २० सप्टेंबर या दिवशी दिवसभर चर्चा करण्यात आली. या विधेयकाद्वारे महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा येथे ३३ टक्के जागा आरक्षित करण्यात येणा
र आहेत. या विधेयकावर चर्चा करतांना अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही या विधेयकाला संमती देत ते लवकर संमत करण्याची मागणी केली. त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हे विधेयक प्रथम आणले होते, असेही सोनिया गांधी या वेळी म्हणाल्या.
लोकसभा में नारी शक्ति वंदन बिल पर चर्चा, लोकसभा में आज इतिहास रचने वाला है
अब महिलाओं को इंतज़ार ना करना पड़े और आगे कभी ना अटके ये बिल ऐसा प्रावधान करेंगे हम: Union Minister of State (I/C) for Law & Justice, @arjunrammeghwal#ATVideo #WoemenReservationBill #ArjunRamMeghwal pic.twitter.com/migDSeVJXZ
— AajTak (@aajtak) September 20, 2023
राज्यसभेतही हे विधेयक मांडण्यात आले. त्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.