कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट वीज निःशुल्क देण्याचा तेलंगाणा सरकारचा आदेश !
मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी भारत राष्ट्र समिती सरकार कोणत्या थराला जाऊ शकते, हे यातून दिसून येते !
भाग्यनगर – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्क वीज देण्याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मागासवर्गियांना दिला जात होता. ‘तेलंगाणा सरकार हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहे’, असा आरोप भाजपने केला आहे. भाग्यनगरचे संसद सदस्य आणि एम्.आय.एम्. पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ही मागणी केली होती.
Free power supply up to 250 units solely to Muslim Dhobis; BJP slams CM Chandrashekhar Rao alleging appeasement politics towards Asaduddin Owaisi via @janamtvenglish https://t.co/MthqDRFxIH #BJP #Telangana #KCR #AsaduddinOwaisi #AIMIM #MuslimDhobis #FreePowerSupply
— Janam English (@janamenglish) September 20, 2023
तेलंगाणामध्ये हिंदूंना केले जाते लक्ष्य ! – भाजप
तेलंगाणामध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार बंडी संजय कुमार यांनीही सरकारच्या या आदेशाचा निषेध केला. ‘तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हिंदु ‘रजक’ समाजाचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत’, असा आरोप कुमार यांनी केला.