लिबियामध्ये ४० सहस्र लोकांच्या मृत्यूची शक्यता !
डर्ना (लिबिया) – लिबियामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डर्ना शहरातील २ धरणे फुटून आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ११ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे; मात्र या घटनेमुळे ४० सहस्र लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. येथील अनेक इमारती, घरे कोसळली आहेत. त्यांच्या ढिगार्यांखाली लोक दबले गेल्याने मृतांचा आकडा ४० सहस्र सांगण्यात येत आहे. तसेच त्यांना बाहेर काढण्यात येणार्या अडचणी, उघड्यावर असणारे मृतदेह यांमुळे येथे महामारी पसरण्याचीही शक्यता आहे.