मिरज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने विश्‍वकर्मा योजनेचे थेट प्रक्षेपण !

मिरज – माजी महापौर आणि ‘ओबीसी’ मोर्चाच्‍या राष्‍ट्रीय सदस्‍य सौ. संगीता खोत यांच्‍या कार्यालयात पंतप्रधान विश्‍वकर्मा योजना आणि यशोभूमीच्‍या उद़्‍घाटनाच्‍या कार्यक्रमाचे ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांना ‘थेट’ पहाण्‍यासाठी नियोजन करण्‍यात आले होते. या वेळी ‘मेरी माटी-मेरा देश’ या कलशाचे पूजन करण्‍यात आले. या प्रसंगी भाजप सांगली जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश ढंग, ओबीसी मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष अमर पडळकर, माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, सचिन पोतदार, उदय मुळे, राजेंद्र नातू, तानजी यमगर, सोपान जानकर यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

या प्रसंगी सौ. संगीता खोत म्‍हणाल्‍या, ‘‘विश्‍वकर्मा योजनेची कार्यवाही करून पंतप्रधानांनी तळागाळातील लोकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याची एक मोठी संधी उपलब्‍ध करून दिली आहे. ग्रामीण भागात वास्‍तव्‍यास असणारा हा समाज सदरच्‍या योजनेचे लाभ घेऊन आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होईल.’’ प्रकाश ढंग म्‍हणाले, ‘‘गरीब कष्‍टकरी लोकांना केंद्र सरकार योजनेच्‍या माध्‍यमातून स्‍वावलंबी बनवण्‍याचे कौतुकास्‍पद कार्य करत आहे.’’