मोगा (पंजाब) येथे खलिस्तानी आतंकवाद्यांकडून काँग्रेसच्या नेत्याची हत्या !
कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याने स्वीकारले हत्येचे दायित्व !
मोगा (पंजाब) – येथील डाला गावात काँग्रेसचे स्थानिक नेते बलजिंदर सिंह बल्ली यांची खलिस्तानी आतंकवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, खलिस्तानी आतंकवादी दुचाकीवरून आले होते. एक जण घरात गेला, तर दुसरा बाहेर थांबवला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या हत्येचे दायित्व खलिस्तानी आतंकवादी अर्शदीप सिंह गिल उपाख्य अर्श डल्ला याने त्याच्या फेसबुक खात्यावरून स्वीकारले आहे. सध्या तो कॅनडामध्ये रहातो. त्याने म्हटले की, त्याच्या आईला पोलिसांनी कह्यात घेतल्याने आणि मित्रांना अटक केल्याने त्याचा सूड उगवण्यासाठी ही हत्या घडवून आणली.
Here is what the allies of @CanadianPM #JustinTrudeau are up to. #Canada based #Khalistani has taken responsibility of the killing in #Punjab #TrudeauWorstPMEver #TrudeuSupportsTerrorists https://t.co/dHTVIJPj72
— HinduPACT (@HinduPACT) September 18, 2023
संपादकीय भूमिकायाविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंड उघडतील का ? अर्श डल्ला याच्यावर कारवाई करतील का ? |