सिवान (बिहार) येथे भाजपच्या प्रभाग अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या
सिवान (बिहार) – येथे भाजपचे प्रभाग अध्यक्ष शिवाजी तिवारी हे कार्यालयातून त्यांच्या दुचाकी वाहनावरून घरी परतत असतांना दुसर्या दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मेहुणा घायाळ झाला. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
बिहार के सीवान में बेखौफ बदमाशों ने सोमवार (18 सितंबर) की रात एक बीजेपी नेता की गोली मारकर हत्या कर दी#Siwan #Bihar https://t.co/HaHFXzaC9Y
— ABP BIHAR (@abpbihar) September 19, 2023
संपादकीय भूमिकाबिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे, हेच अशा घटनांवरून लक्षात येते ! |