खासदारांनी घेतला जुन्या संसदेचा निरोप !
नवी देहली – जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनामध्ये जाण्यापूर्वी सर्व खासदारांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्र येऊन निरोप घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांना संसद भवनाच्या नव्या इमारतीत घेऊन गेले. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, ही घटना आपल्याला भावनिक बनवते आणि कर्तव्यासाठी प्रेरित करते. स्वातंत्र्यापूर्वी हे भवन एक प्रकारचे ग्रंथालय म्हणून वापरले जात होते. नंतर संविधान सभेची बैठक चालू झाली आणि येथे आपली राज्यघटना आकाराला आली. येथेच वर्ष १९४७ मध्ये ब्रिटीश सरकारने सत्ता हस्तांतरित केली. हे सभागृह त्या प्रक्रियेचे साक्षीदार आहे.
Dressed in colourful attire, members of the Lok Sabha and the Rajya Sabha got their group photograph clicked in the old Parliament building, hours before legislative proceedings shift to the new Parliament House.https://t.co/8QeFyleP57
— The Hindu (@the_hindu) September 19, 2023