पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !
नवी देहली – ‘सर्व देशवासियांना श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपति बाप्पा मोरया !’, अशा शब्दांत मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी या ट्वीटसमवेत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपति मंदिरातील त्यांचे जुने छायाचित्र पोस्ट केले आहे.
देशभर के मेरे परिवारजनों को गणेश चतुर्थी की मंगलकामनाएं। विघ्नहर्ता-विनायक की उपासना से जुड़ा यह पावन उत्सव आप सभी के जीवन में सौभाग्य, सफलता और संपन्नता लेकर आए। गणपति बाप्पा मोरया! pic.twitter.com/h3u3ltDcVH
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
मराठीसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरे एक ट्वीट करत देशातील सर्व नागरिकांना हिंदीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरातील माझ्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्त्या विनायकाचा हा उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि संपन्नता घेऊन येवो. गणपति बाप्पा मोरया !