जगताचे कल्याण करणारे ‘जगजेठी’ ।
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
देवा, ‘जगजेठी’ सांगू का कोण ?
सनातन धर्माचा निर्माता, परमेश्वर (श्रीविष्णु) ।
सनातन धर्माचे ज्ञान देणारा, श्रीकृष्ण ॥ १ ॥
सनातन धर्माची शिकवण देणारे,
ऋषिमुनी आणि संत ।
सनातन धर्माचे पुनरूत्थान करणारे, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ॥ २ ॥
हे सारे जण जगाचे कल्याण करणारे; म्हणून ‘जगजेठी’(टीप १) ।
टीप १ : जगजेठी, म्हणजे जगत् + ज्येष्ठ असा परमेश्वर
– कृष्णपुष्प (पुष्पांजली, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), बेळगाव, (गुरुपौर्णिमा (देवपौर्णिमा) १३.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |