Ganpati : गजमुख ओंकाररूप।
गजमुख ओंकाररूप।
चित्तमोहक जीवनी तू ॥ १ ॥
लंबोदर विस्मयकारक ।
गणाधिपति प्रथमेश तू ॥ २ ॥
रजोनिवारक विघ्नहर्ता ।
आनंद देशी सकलांस तू ॥ ३ ॥
प्रथमपाद मूलाधारी तू ।
जय गणेशा वंदन तुजला ॥ ४ ॥
सकल विद्यानिधी यशदाता ।
धन्य धन्य कृपासक्त मी तव चरणा ॥ ५ ॥
अर्पितो सर्वस्व तव चरणा ।
करावी कृपा मजवरी भवसागर तरण्या ॥ ६ ॥
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२३)
(Ganpati)