साधिकेला एकादशीच्‍या व्रताची सांगता भूवैकुंठात (रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात) करण्‍याचे लाभलेले सौभाग्‍य !

साधकांचा आनंद द्विगुणित करणारी कृपाळू गुरुमाऊली !

श्रीमती अर्चना लढ्ढा

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील खोलीतील कचरापेटीतून सुगंध येणे आणि केर भरतांना दैवी कण मिळणे

‘गुरुदेवांच्‍या कृपेमुळे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे) आम्‍हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍य करता आले. आम्‍ही आश्रमात रहायला आल्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी मी खोलीतील कचरापेटी उघडल्‍यावर मला सुगंध येत होता. सुपलीत केर गोळा करत असतांना मला चमकणारे दैवी कण मिळाले.

२. दोन वर्षांपासून एकादशीचे व्रत करत असणे आणि या व्रतातील शेवटचा उपवास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍याचे सौभाग्‍य प्राप्‍त होणे

मागील २ वर्षांपासून मी एकादशीच्‍या दिवशी उपवास करत आहे. हे व्रत पूर्ण झाल्‍यानंतर राजस्‍थान येथील प्रथेनुसार त्‍याचे उद्यापन करायचे असते. मला वाटत होते, ‘या व्रतातील माझा शेवटचा उपवास मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात करायला मिळाला, तर माझे व्रत सफल होईल.’ ‘पापमोचनी एकादशी’ व्रत आश्रमातच करण्‍याचे सौभाग्‍य गुरुकृपेने मला प्राप्‍त झाले.

३. ‘एकादशीच्‍या व्रताची भूवैकुंठात (रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात) सांगता होणे आणि त्‍या दिवशी श्रीविष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभल्‍याने व्रत सफल झाले’, असे वाटणे

संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि संत जनाबाई एकादशीचे व्रत करून रात्री विठ्ठलाच्‍या नामसंकीर्तनात रममाण होत असत. त्‍या वेळी साक्षात् विठ्ठल त्‍यांच्‍यासमोर उभा रहात असे. तेव्‍हा त्‍यांना किती आनंद वाटत असेल ! तसाच आनंद गुरुदेवांनी मला भूवैकुंठात सूक्ष्मातून प्रदान केला. माझ्‍या व्रताची भूवैकुंठात सांगता होणे आणि त्‍याच दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभणे, हे मला अगदी त्‍याच प्रकारे वाटत होते. ‘त्‍या संतांप्रमाणे मला श्रीविष्‍णुस्‍वरूप गुरुदेवांचे दर्शन झाले आणि माझे व्रत सफल झाले’, असे मला वाटले.’

– श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्‍थान.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक