उघडपणे होणार्या गुन्ह्यांसाठी भक्तांनी सांगितल्याविना कृती न करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अॅप’ (आरक्षण करणारे अॅप) गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत. खासगी वाहतूक आस्थापनांना एस्.टी.च्या तुलनेत दीडपट अधिक प्रवासी भाडे आकारण्याचा शासन आदेश असतांना ते दुप्पट, तिप्पट दर आकारत आहेत. ‘गणेशभक्तांवर आलेले लूटमारीचे विघ्न दूर करण्यात शासनाने पुढाकार घ्यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.’ (१४.९.२०२३)