हरितालिका व्रत
आज ‘हरितालिका तृतीया’ आहे. त्या निमित्ताने…
‘पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला करतात. त्या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पुजल्या जातात, रात्री जागरण करतात, दुसर्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंंग आणि मूर्ती विसर्जित करतात.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)