इंग्रजांकडून भारताचा इतिहास विकृत कसा केला गेला ?
इंग्रजांनी भारताची बौद्धिक संपत्ती नष्ट करण्याचे दायित्व ‘ऑक्सफोर्ड विद्यापिठा’च्या बोडेन पिठाला दिले होते. जर्मनीतील उद्योग नष्ट करण्यासाठी साम्यवादाचे प्रचार केंद्र केंब्रिजच्या विद्यापिठात होते. त्याचा रशियात प्रचारासाठी उपयोग केला गेला. ब्रिटिशांचे हस्तक असलेले लेनिन हे रशियाच्या झार राजाच्या तावडीत सापडू नयेत, यासाठी ते ब्रिटनमध्ये आश्रय घेत असत. वेदांचा विरोध करणारे साहित्य आणि साम्यवादी साहित्य या दोन्हीची प्रकाशने अन्य देशांसाठी होती, ती ब्रिटनसाठी नव्हती. झार शासन, तसेच भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणारे ते प्रचार साहित्य होते. याच्या परिणामातून रशिया आणि चीन यातून आधीच मुक्त झाले आहेत. भारत मात्र अजून त्यांच्या जाळ्यात अडकलेला आहे.
१. युरोपियन लेखकांनी केलेला खोटा प्रचार
भारतीय इतिहास नष्ट करण्याचा निश्चय विल्यम जोन्सने केला होता. ‘येथील संस्कृत, तसेच भारतीय भाषेतील साहित्य हे युरोपियन साहित्याची नक्कल आहे’, असा भ्रम सर्वत्र निर्माण करणे, हे त्याचे उद्दिष्ट होते. वर्ष १८३१ मध्ये ऑक्सफर्डमध्ये स्थापन झालेल्या बोडेन पिठाचा एकमात्र उद्देश होता की, भारतीय संस्कृती नष्ट करून ख्रिस्ती मताचा प्रचार करणे ! हा उद्देश जवळपास सर्व युरोपियन लेखक मॅक्स मुल्लर, वेबर, म्युर, रॉय, कीथ, मॅक्डोनल इत्यादींनी त्यांच्या अत्यंत स्पष्टपणे त्यांच्या ग्रंथांच्या भूमिकेत निःसंदिग्धपणे प्रकट केला आहे. ते वारंवार म्हणतात, ‘आम्ही वेदिक संस्कृती नष्ट करण्यासाठी खोटा प्रचार करत आहोत’; पण स्वतःला ब्रिटिशांचे सेवक असल्याचे मानणारे भारतीय, प्रत्येक भारतीय शास्त्र खोटे समजून इंग्रजी मान्यतेनुसार संशोधन करतात.
अमेरिका, रशिया, चीन हे देश नवीन विश्वशक्ती बनले आहेत; पण ते सर्वजण इंग्लंडलाच खोटेपणाची परमशक्ती मानतात. ‘इराकमध्ये नरसंहारक शस्त्रे आहेत’, असा खोटा अहवाल देण्याचे दायित्व इंग्लंडवर त्यांनी सोपवले आणि त्या आधारे अमेरिकेने इराकवर आक्रमण केले.
२. इतिहास नष्ट करण्याच्या पद्धती
२ अ. मूळ स्रोत नष्ट करणे किंवा सोडून देणे : ३-४ व्यक्तींच्या टोळीद्वारे परस्परांच्या खोट्या लेखांना उद़्धृत करणे. मॅक्स मुल्लरने वेबरला उद़्धृत करायचे, वेबरने म्युलरला उद़्धृत करायचे आणि म्युलरने परत मॅक्स मुल्लरला उद़्धृत करायचे. डेव्हिड पिंगरी याने या पद्धतीत थोडी सुधारणा केली. तो ४ खोटे लेख लिहून शोधपत्रिकांमधून प्रकाशित करत असे. हे चारही लेख एकच खोटी गोष्ट अनुमानात थोडा थोडा शब्द पालट करून लिहिली जात असे. पाचवा लेख आपल्याच ४ खोट्या लेखांना उद़्धृत करून प्रमाणित केला जात असे. या पद्धतीने त्याने आर्यभटच्या ज्या सारणीला हिप्पार्कसची नक्कल म्हटले, हिप्पार्कस किंवा कोणत्याही ग्रीक व्यक्तीने आजपर्यंत कोणतीही सारणी बनवली नाही; कारण त्यांच्या संख्या लेखन पद्धतीत हे शक्य नाही.
२ आ. निश्चित झालेल्या तिथीस काल्पनिक तिथीत पालटणे : बहुतेक लेख किंवा पट्ट्यांमध्ये प्रारंभी किंवा शेवटी तिथी दिलेली असे; परंतु इंग्रज ती पुसत असत. सम्राट खारवेलच्या शिलालेखातील कली संवत्ची संख्या नाहीशी केली होती. खारवेलच्या नेतृत्वाखाली मगध विरुद्ध ओडिशाचा स्वातंत्र्य संग्राम झाल्याचे इंग्रजांना दाखवायचे होते; म्हणून त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पालट केले. खारवेलला चेदी राजाच्या वंशावळीपासून वेगळे करून अट्टाहासाने ओडिशात जन्मलेला दाखवला गेला. खरे तर त्याने आपल्या पूर्वजांच्या नावे भुवनेश्वरजवळ शिशुपाल गड बनवला होता. मगधशी युद्ध केले नव्हते, तर त्याने मगधला सहाय्य करण्यासाठी मथुरेत शकांना हरवले होते. याविषयी आंध्रवंशीय राजा पूर्णोत्संगने त्याला धन्यवाद दिले होते. त्याची जी कारकीर्द काढली आहे, त्या अवधीत भारतावर कुणाचे विदेशी आक्रमण झालेले नव्हते; परंतु येशूच्या शिष्यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे हे सारे घडले.
कर्नल टॉडने राजपूत राजे हे हुण-शकांचे वंशज असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्व शिलालेख तोडून टाकले. कुंभलगढच्या शिलालेखाचे शेकडो तुकडे केले गेले; कारण त्या शिलालेखात ‘राणा कुंभाने त्याचे पूर्वज बाप्पा रावळ हे ब्राह्मण होते’, असे लिहिले होते.
‘मैसुरू अँटीक्वेरी’च्या जानेवारी १९०० मध्ये जनमेजयाची ५ दानपत्रे प्रकाशित झाली. त्यात वर्ष, संवत्सर, मास, तिथी, वार, नक्षत्र, करण सर्व दिले होते. त्याला नष्ट करता आले नाही. या व्यतिरिक्त त्या दिवशी (युधिष्ठिर शक ८९, प्लवंग वर्ष, पौष अमावस्या) सूर्यग्रहणाची वेळ दिली आहे; परंतु इ.स. पूर्व २७.११.३०१४ ही तिथी रिचर्ड टेंपलला मान्य नव्हती, म्हणून पत्रिकेच्या संपादकाने कोलब्रूकजवळ तिथी पालटण्यासाठी साहाय्य मागितले.
२ इ. सूक्ष्म विरोधाचा शोध : ज्ञानप्राप्तीसाठी ‘ब्रह्मसूत्रा’त म्हटले आहे, ‘शास्त्र समन्वयाने वाचले पाहिजे.’ युरोप अमेरिकेत समन्वयाऐवजी विरोधाचा नाश हाच हेतू आहे. जर पुस्तकाच्या दोन प्रतींमध्ये एखाद्या शब्दामध्ये मात्रेची जरी तफावत दिसली, तरी ते पुस्तक वर्ज्य ठरते. समस्या अशी होती की, कोट्यवधी पुस्तके जाळूनही बरीचशी त्यातून बचावलेली आहेत. नालंदा विद्यापिठातील ९५ लाख पुस्तके जाळली होती. केरळच्या एका पाद्य्राने आयुर्वेदाची ६ सहस्र पुस्तके जाळली. यामुळे लोक आयुर्वेदाकडे न वळता चर्चच्या रुग्णालयामध्ये येतील, अशी त्याची कल्पना !
सिकंदर आक्रमणाच्या आधी, म्हणजे ६ सहस्र ४५१ वर्षे आणि ३ मास आधी डायेनिससने भारतावर आक्रमण केले होते. त्यानंतर सिकंदर येईपर्यंत भारतीय राजांच्या १५४ पिढ्यांनी राज्य केले. यवन आक्रमणात मारल्या गेलेल्या सूर्यवंशी राजा बाहूपासून गुप्त वंशाच्या प्रथम राजापर्यंत सुसंगत गणना मिळते; परंतु इंग्रजांना मौर्य राज्य १ सहस्र ३०० वर्षे मागे नेऊन इतिहास नष्ट करायचा होता; म्हणून त्याचा उल्लेख केला जात नाही. भारताच्या कुठल्याही ग्रंथालयात मूळ पुस्तके ठेवली जात नव्हती, जेणेकरून लोकांना आपला इतिहास समजू नये.
२ ई. संस्कृतला मृत भाषा घोषित करणे : जगाची एकमात्र जिवंत भाषा संस्कृत आहे. तिच्या शब्दांचे अर्थ लोकभाषांमध्ये आजही तेच आहेत, जे ३१ सहस्र वर्षांपूर्वी होते. पतंजलिनेही महाभाष्याच्या प्रारंभी लिहिले आहे, ‘७ द्वीपांमध्ये प्रचलित लोकभाषांचे अर्थ शोधले पाहिजेत.’ ७ द्वीप तर दूर लोकांना आपल्या गावच्या भाषेचे शब्दही सध्या पहात नाहीत; कारण लहानपणापासून शिकवले गेले आहे की, आर्य ख्रिस्तीपूर्व वर्ष १५०० मध्ये बाहेरून भारतात आले आहेत. हे वेडे अध्ययन बंद करण्यासाठी प्रचार करण्यात आला की, याची लिपी नाही, ज्यामुळे लिपींचे वर्गीकरण शास्त्र इत्यादी समजू शकत नाही.
२ उ. पुराणांना अविश्वसनीय मानणे : प्रत्येक पुराणाविषयी आधुनिक संशोधकांच्या म्हणण्यानुसार इ.स. १२०० पूर्वी कोणतेही पुराण लिहिले गेले नाही. या तिथीचा संबंध इ.स. पूर्व १२०४ मध्ये बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठ जाळण्याच्या संदर्भात आहे. आजचे प्राध्यापक ग्रंथालयात बसून, तसेच ‘इंटरनेट’वरून पुस्तके पाहून शोधही घेत नाहीत. ग्रंथालये नष्ट झाल्यावर पुराणे कशी लिहिली गेली ? उलट त्या वेळी लोक जीव वाचवण्यासाठी ओडिशा, आसाम, नेपाळ येथे आश्रय घेत होते.
३. भारतीय शास्त्रांचे शिक्षण भारतीय पद्धतीने देणे आवश्यक !
या प्रकारे इंग्रजी शिक्षण येताच हिंदु समाजाला धर्मशास्त्राचे शिक्षणच दिले गेले नाही. बहुतांश प्राध्यापकांना भारताच्या संदर्भात काही माहिती नाही. तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात केवळ आद्यशंकराचार्यांचे तत्त्वज्ञान शिकवतात. कोणत्याही इतिहास लेखकांनी आतापर्यंत विक्रम संवत्, शालिवाहन शक यांची नावेही ऐकली नाहीत. ज्योतिष, लेखक, तसेच प्राध्यापकही शक आणि संवत् यांचा अर्थ विसरून गेले आहेत. समाज अध्ययनातही केवळ वर्गभेद, तसेच संघर्ष सांगितला गेला आहे. जीवनभर वेद शिकणारेही ‘वेदांची उत्पत्ती इ.स. पूर्व १५०० मध्ये सिंधु संस्कृतीपासून झाली’, असे मानतात. भारतीय शास्त्रांचे शिक्षण भारतीय पद्धतीने चालू झालेच नाही. पहिल्यापासूनच उलट्या गोष्टी सांगितल्या गेल्या; म्हणून प्रत्यक्ष गोष्ट दिसतच नाही.
(साभार : ‘भारतीय धरोहर’चे संकेतस्थळ)