मथुरेतील बांकेबिहारी मंदिराची मुसलमानांनी लाटलेली भूमी परत घेण्याचा उच्च न्यायालयाचा प्रशासनाला आदेश
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – मथुरेतील बांके बिहारी महाराज मंदिराच्या ज्या भूमीवर मुसलमानांनी कब्रस्तान बनवले आहे, ती भूमी पुन्हा मंदिराच्या नावावर करण्यात यावी, असा आदेश प्रयागराज उच्च न्यायालयाच्या मथुरा खंडपिठाने छाता तालुक्याच्या प्रशासकीय अधिकार्यांना दिला.
‘Restore graveyard land in name of Banke Bihari Ji Maharaj temple’: Allahabad HC directs Mathura admin to correct land recordshttps://t.co/qI8nagAjh3
— OpIndia.com (@OpIndia_com) September 17, 2023
१. ‘श्री बिहारीजी सेवा ट्रस्ट’कडून या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यात म्हटले होते की, वर्ष २००४ मध्ये महसूल विभागाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून सदर भूमी मुसलमानांचे कब्रस्तान असल्याचे दाखवण्यात आले होते. या संदर्भात ११ ऑगस्ट २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने याची माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता, तसेच वर्ष २००४ मध्ये भूमीचा मालकी अधिकार कसा काय पालटला ? कागदात फेरफार कशी झाली ?, अशी विचारणा केली होती.
२. या प्रकरणी धर्म रक्षा संघाचे श्री. रामअवतार गुर्जर यांनी सांगितले की, भोला पठाण याने अधिकार्यांशी संगनमत करून भूमी लाटली होती. पठाण समाजवादी पक्षाचा बुथ अध्यक्ष होता. मुसलमानांनी या भूमीवरील ऐतिहासिक बांकेबिहारी यांचे सिंहासन तोडून तेथे मजार (मुसलमानाचे थडगे) बनवली होती.
संपादकीय भूमिकाअसा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन ही भूमी स्वतःहून कह्यात का घेत नाही ? |