क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार
लाहोर (पाकिस्तान) – लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ही याचिका घटनापिठाकडे पाठवण्यात आली होती. या याचिकेत भगतसिंह यांनी मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचीही मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने यावर आक्षेप घेतला आहे.