कॅनडाने भारतासमवेतच्या मुक्त व्यापारावरील चर्चा पुढे ढकलली !
जोपर्यंत खलिस्तान्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही ! – भारताचा पवित्रा
ओटावा (कॅनडा) – कॅनडाने भारतासमवेच्या मुक्त व्यापारावरील चर्चा पुढे ढकलली आहे. कॅनडाच्या व्यापार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला असला, तरी यामागील कारण सांगण्यात आलेले नाही. या चर्चेच्या संदर्भात एका भारतीय अधिकार्याने सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापाराशी संबंधित चर्चा इतर समस्यांचे निराकरण झाल्यावरच होईल. कॅनडामध्ये अशा काही राजकीय घडामोडी घडत होत्या, ज्यावर भारताने आक्षेप घेतला. जोपर्यंत त्यांचे निराकरण होत नाही. तोपर्यंत कॅनडासमवेतच्या व्यापार कराराची चर्चा थांबलेली आहे.
Canada postpones October trade mission to India due to “certain political developments”https://t.co/DNxJvf48Uf
— OpIndia.com (@OpIndia_com) September 16, 2023
देहली येथे १० सप्टेंबर या दिवशी जी-२० परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये कॅनडातील खलिस्तान्यांच्या भारतविरोधी कारवायांच्या संदर्भात कठोर कृती करण्याविषयी सांगितले होते. त्यानंतर केवळ ६ दिवसांनी कॅनडाकडून भारतासमवेतची चर्चा पुढे ढकलली आहे. कॅनडासमवेत १० वर्षांच्या मुक्त व्यापार करारासाठी चर्चा चालू आहे.
संपादकीय भूमिकाकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भारतद्वेषी आणि खलिस्तानप्रेमी मानसिकता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत कॅनडाकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थच म्हणावे लागेल ! |