खेडा (गुजरात) येथे भगवान शिवाच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक

  • ५ पोलिसांसह ९ जण घायाळ

  • १७ मुसलमानांना अटक

खेडा (गुजरात) – येथील ठासरा भागातील राम चौकात भगवान शिवाच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीवरून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये ५ पोलिसांसह ९ जण घायाळ झाले. या प्रकरणी पालिसांनी १७ मुसलमानांना अटक केली आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. या दगडफेकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. मिरवणूक मशिदीजवळ पोचल्यानंतर मशिदीच्या छतावरून दगडफेक चालू झाली. त्यामुळे गोंधळ उडाला. या मिरवणुकीला पोलिसांचे संरक्षण असतांनाही ही घटना घडली. पोलीस या प्रकरणाचे आता अन्वेषण करत आहेत.

दगडफेकीसाठी कुणी चिथावणी दिली होती का ? त्यासाठी छतावर दगड कुणी आणि कधी आणून ठेवले ? आदी गोष्टींचे अन्वेषण केले जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • मशिदी नमाजपठण करण्यासाठी आहेत कि हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करण्यासाठी ?, याची आता चौकशी करणे आवश्यक आहे ! देशात अनेक वर्षांपासून अशा घटना घडत असतांनाही पोलीस मशिदींची आणि त्यांच्या छताची पडताळणी का करत नाहीत ? कि पोलीस तेथे जाण्यास घाबरतात ?
  • हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणार्‍या मशिदींवरही आता बुलडोजर चालवून त्या पाडण्याची मागणी कायदाप्रेमी नागरिकांनी केली, तर चुकीचे ठरू नये !