सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक
सावंतवाडी – गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आंध्रप्रदेश येथील कालापला राजेश आणि अप्पांना ससी किरण या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचे मद्य आणि १० लाख रुपये किमतीची गाडी, असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. १५ सप्टेंबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिकामद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ? |