नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास आडकाठी आणू नये !
हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
कोल्हापूर – गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी घातली जाते. तरी असे न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू द्यावे. पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात मूर्तीविसर्जन करण्यास आठकाडी आणू नये, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
१. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मनोज पोवार, भाजपच्या सौ. अर्चना रिंगणे, सर्वश्री विश्वनाथ पाटील, विनोद भोसले, अक्षय मोरे, दीपक भादवणकर आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
२. इचलकरंजी येथे प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, धारकरी सर्वश्री प्रसाद जाधव, सुशांत घोरपडे, मंगेश म्हसकर, धर्मप्रेमी सर्वश्री नंदकिशोर एडके, ओंकार मगदूम, मंगेश खोत, सोमेश तेलवे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सूर्यकांत ओझा आणि श्री. आनंदा मकुटे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री गणेशमूर्ती दानाची सक्ती करणार नाही ! – विद्या पंडित-कदम, मुख्याधिकारी, मलकापूर
मलकापूर – मलकापूर येथे श्री गणेशमूर्ती दानाची सक्ती करणार नाही. नगर परिषदेच्या वतीने मूर्तीदान करण्यासाठी भाविकांना देण्यात येणारा प्रोत्साहनपर पारितोषिकाचा भाग कार्यक्रमातून वगळू, तसेच ‘मलकापूर येथील गणेशभक्त-भाविक हे १०० टक्के मूर्तीदानाच्या विरोधात आहेत’, असे पत्र कोल्हापूर येथील जिल्हाधिकार्यांना पाठवू, असे आश्वासन मलकापूर येथील मुख्याधिकारी विद्या पंडित-कदम यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन दिल्यावर त्यांनी हे आश्वासन दिले.
या वेळी धर्मप्रेमी श्री. रमेश पडवळ, व्यावसायिक श्री. प्रमोद नागवेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते, जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी नगरसेवक श्री. विकास देशमाने, पर्यावरण समितीचे सदस्य श्री. महेश कोठावळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, सर्वश्री सर्वश्री चेतन गुजर, रूपेश वारंगे, भरत पाटील उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. धर्मप्रेमींनी चर्चा करतांना ‘प्रशासनाने प्रथम नदीत सोडणारे मैलायुक्त पाणी बंद करावे आणि नंतर मूर्तीदान मोहिमेच्या संदर्भात चर्चा करावी’, असे ठामपणे सांगितले.
२. धर्मप्रेमी श्री. चारुदत्त पोतदार आणि काँग्रेसचे नगरसेवक श्री. सुहास पाटील यांनी ‘प्रशासनाने काही धर्मद्रोही लोकांच्या समाधानासाठी मूर्तीदान मोहीम राबवू नये’, असे सांगितले.