सभेला आलेले निम्म्याहून अधिक सदस्य खोटे ! – शौमिका महाडिक यांचा आरोप
गोकुळ दूध महासंघ सर्वसाधारण सभा
कोल्हापूर – गोकुळ दूध महासंघाच्या सर्वसाधारण सभेतील निम्म्याहून अधिक सदस्य खोटे आहेत. हे सभासद छायांकित प्रत घेऊन आले आहेत आणि त्यांना या प्रती येथेच वाटण्यात आल्या आहेत. बाहेर थांबलेले अनेक सभासद खरे असून ते अद्यापही आत जाऊ शकलेले नाहीत, असा आरोप संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी केला. १५ सप्टेंबरला गोकुळ दूध महासंघाची ६१ वी सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी हे आरोप केले.
गोकुळ दूध महासंघ सभेत निम्म्याहून जास्त सदस्य बोगस असल्याचा आरोप; मुश्रीफ-पाटील वि. महाडिक कलगीतुरा!#Maharashtra #Kolhapur #GokulDoodhMahasangh #HasanMushrif https://t.co/llaLUhQmzQ via @loksattalive
— LoksattaLive (@LoksattaLive) September 15, 2023
या संदर्भात सत्ताधारी गटाचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘सभासद आधीच येऊन बसले आहेत. महाडिकांचे कार्यकर्ते दंगा करत आहेत. कोल्हापूरच्या दृष्टीने, सहकाराच्या दृष्टीने हे अशोभनीय आहे. जे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरे संचालक मंडळ देणार आहे.’’ आरोप-प्रत्यारोपांमुळे गोकुळ दूध महासंघाची सभा प्रचंड गोंधळात पार पडली.