श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा सिद्ध करतांना कोल्हापूरचा बाज राखला जावा ! – दीपक केसरकर, पालकमंत्री
कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करतांना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा सिद्ध करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्पना स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात अंदाजे १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्पर्धकांनी सिद्ध केले आहेत. या आराखड्यांचे सादरीकरण पालकमंत्री केसरकर यांनी पाहिले, तसेच त्या संदर्भातील सूचना दिल्या.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘जोतिबा प्राधिकरणाचा अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर येथील विकासकामे करतांना दगडी बांधकामावर भर द्यावा. मराठा वास्तूशैलीचा वापर करावा, तसेच आवश्यक निधीचे प्रावधान होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.’’