पोलिसांवर आक्रमण करणारा आंबिवली (कल्याण) येथील धर्मांध अटकेत !
ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण परिसरात घरफोड्या, वाहनचोरी करणारा, तसेच पोलिसांवर आक्रमण करण्यात पटाईत असलेला जाफरी उपाख्य आफ्रिदी या सराईत गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी आंबिवली येथील अटाळी भागातील इराणी वस्तीमधून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्यावर ३० गुन्हे नोंद आहेत. १० गुन्ह्यांमधील अन्वेषणासाठी विविध पोलीस ठाण्यांना तो हवा आहे. त्याच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास साहाय्य होणार असल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच इराणी गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस करत आहेत. |