डोंबिवली येथे धोकादायक इमारत कोसळली !
ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली पूर्व भागातील आयरेगाव येथे असलेली आदिनारायण भुवन ही ४ मजल्यांची इमारत १५ सप्टेंबरला संध्याकाळी कोसळली. ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्यात आली होती. महानगरपालिकेने ही इमारत यापूर्वीच धोकादायक म्हणून घोषित केली होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्नीशमनदलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावाचे कार्य चालू केले.
या इमारतीत एक महिला अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.