डोंबिवली येथे महावितरणच्या कर्मचार्यांवर आक्रमण !
ठाणे, १५ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली पश्चिम येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ आणि त्याचा सहकारी यांच्यावर जुनी डोंबिवली येथील वीजग्राहक अन् त्याचा भाऊ यांनी शिवीगाळ करत आक्रमण केले. तेजस शिर्के आणि शुभम शिर्के या भावांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाणे येथे महावितरण कर्मचार्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वारंवार कळवूनही थकबाकीदार देयक भरणा करत नव्हता. संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन वीजदेयक भरण्याची सूचना करावी आणि ‘रक्कम भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करून वीजमीटर काढणार’, अशी सूचना वरिष्ठांनी तंत्रज्ञाला दिली होती. तंत्रज्ञ कारवाईसाठी गेल्यावर वरील प्रकार घडला.