इजिप्तमध्ये शाळेत विद्यार्थिनींना नकाब वापरण्यावर बंदी !
(नकाब म्हणजे मुसलमान महिलांकडून डोके, मान आणि चेहरा झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र. यात केवळ महिलांचे डोळे दिसतात.)
कैरो – इजिप्तमध्ये ३० सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाला आरंभ होत आहे. या चालू वर्षात विद्यार्थिनींना नकाब घालून येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
Is Egypt’s veil ban a violation of religious freedom?https://t.co/5NKvneUX3s
— WION (@WIONews) September 12, 2023
देशाचे शिक्षणमंत्री रेडा हेगाजी यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी सांगतांना म्हटले की, सरकारच्या नव्या नियमावलीनुसार विद्यार्थिनी डोक्याचा भाग झाकू शकतात; मात्र त्यांनी चेहरा उघडा असणे आवश्यक आहे. या नियमांचा उल्लंघन करणार्या मुलींना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.
देशातील कट्टरतावादी संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे, तर सामान्य जनतेने स्वागत केले आहे. सामाजिक माध्यमांवर याविषयी चर्चा चालू असून ‘तालिबानी आणि इस्लामिक स्टेट यांचे समर्थन करणारे लोकच या निर्णयाला विरोध करत आहेत’, असे लोकांचे म्हणणे आहे. देशातील अनेक खासगी संस्थांनी नकाब वापरण्यावर बंदी घातली आहे. याआधी, म्हणजे वर्ष २०१५ मध्ये देशातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणार्या काहिरा विद्यापिठाने महिला प्राध्यापिकांना नकाब वापरण्यावर निर्बंध घातले होते. या निर्णयाला तेथील न्यायालयात आव्हान देण्यात आले; मात्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला होता.
संपादकीय भूमिकाजगभरातील काही इस्लामी देश महिलांवर लादण्यात येणारे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहेत. भारतात मात्र शाळेत मुलींना हिजाब (डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यावर निर्बंध लादल्यावर बहुतांश मुसलमान थयथयाट करतात, हे लक्षात घ्या ! |