राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड
देशविरोधी कारवाया केल्यावरून उसगाव येथे दहावी इयत्तेतील मुलगा कह्यात
पणजी, १४ सप्टेंबर (वार्ता.) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) देशविरोधी कारवाया करणार्यांच्या विरोधात झारखंड, उत्तरप्रदेश आदी भागांत शोधमोहीम हाती घेतली आहे. ‘एन्.आय.ए.’ला झारखंड येथील एका गुन्ह्याचे अन्वेषण करतांना त्याचे काही धागेदोरे गोव्यात आढळून आल्याने यंत्रणेचे एक पथक १४ सप्टेंबर या दिवशी पहाटे तिस्क-उसगाव येथे उपस्थित झाले. या पथकाने अन्वेषणासाठी फोंडा पोलिसांचे सहकार्य घेतले. पथकाने तिस्क-उसगाव येथे एका सदनिकेत रहात असलेल्या दहावी इयत्तेत शिकणार्या १४ वर्षीय मुलाला कह्यात घेऊन त्याच्याकडील भ्रमणभाष, ‘सीमकार्ड’, ‘पेनड्राइव्ह’, आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य कह्यात घेऊन त्याचे ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘टेलिग्राम’ खाते गोठवले. या मुलाचे आईवडील हे मूळ उत्तरप्रदेश येथील आहेत आणि ते गेले दशकभर गोव्यात वास्तव्यास आहेत. संबंधित मुलाला २२ सप्टेंबर या दिवशी झारखंड येथे संबंधित प्रकरणाच्या अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.
#NIA conducts search at #Usgao, seizes electronic #gadgets from 14 yr old #UP native
Read: https://t.co/UMLNNhs8zl#Goa #Breakingnews #Jharkhandcase pic.twitter.com/O51JP9E6Fj
— Herald Goa (@oheraldogoa) September 14, 2023
आतंकवादी कारवायांशी निगडित उत्तरप्रदेश येथील घर कह्यात
‘एन्.आय.ए.’ने लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश येथील एक घर ‘आतंकवादी कारवायांचे केंद्र’ म्हणून घोषित करून ते कह्यात घेतले आहे. या घराचा वापर ‘अल्-कायदा’ या प्रतिबंधित संघटनेशी संलग्न असलेल्या ‘अन्सार गजवत-उल-हिंद’ या संघटनेच्या सक्रीय सदस्यांनी केल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.
(सौजन्य : OHeraldo Goa)
संपादकीय भूमिकाआतंकवादी कारवायांशी निगडित संशयितांना गोवा राज्य रहाण्यासाठी सुरक्षित का वाटते ? काही मासांपूर्वी मुरगाव तालुक्यातील एका मुसलमानाला अशाच प्रकारे कह्यात घेण्यात आले होते. त्यापूर्वीही काही आतंकवादी गोव्यात कळंगुट येथे काही दिवस निवासाला असल्याचे आढळले होते. अमली पदार्थ व्यवहाराविषयीही तेलंगाणाचे पोलीस गोव्यात येऊन मोठी कारवाई करतात. या गोष्टी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या आहेत ! |